🕉️🔱🌼।।ॐ नमः शिवाय ।।ॐ श्री भगवती दुर्गा देव्यै नमः।। 🪷🍃🙏🏻

ॐ नमः शिवाय ज्योतिष सेवा: जन्मकुंडली विश्लेषण, रत्न आणि वास्तू मार्गदर्शन

सर्वांत प्रथम ॐ नमः शिवाय ज्योतिष संस्थानतर्फे आपले सहर्ष स्वागत!

जर तुम्हाला किंवा तुमच्या परिवारातील अन्य सदस्यांसाठी ज्योतिषीय मार्गदर्शन, रत्न मार्गदर्शन तसेच रहिवासी किंवा व्यावसायिक वास्तूसाठी १००% अचूक मार्गदर्शन पाहिजे असेल, तर तुम्ही आमच्या विविध सेवांसाठी सशुल्क बुकिंग करू शकता. ॐ नमः शिवाय ज्योतिष संस्थानतर्फे प्रदान केल्या जाणाऱ्या ज्योतिषीय सेवा, त्यासाठी आकारले जाणारे शुल्क, आणि आमची ज्योतिषीय विश्लेषण करण्याची पद्धत या वेबपेजवरच खाली नमूद केलेली आहे.

आजकाल इंटरनेटवर सर्व ठिकाणी, विशेषतः इंस्टाग्राम आणि फेसबुक वर “फक्त ₹१९९ मध्ये तुमच्या पुढील १० वर्षांची कुंडली मिळवा” किंवा ₹९९९ मध्ये तुमच्या संपूर्ण जीवनाची ३५० पानांची रंगीत कुंडली मिळवा” या प्रकारच्या मराठी, तसेच “Get Your Completely Personlized Kundli Report in Just ₹99” अथवा “Buy Original Yellow Sapphire at ₹999, including Shipping” अशा इंग्रजी भाषेतील अनेक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील.

खरे सांगायचे तर अशा प्रकारची कुंडली तुम्ही एकही रुपया खर्च न करता इंटरनेटद्वारे मोफत प्राप्त करू शकता. AstroSage सारखे अनेक ऑनलाईन फ्री कुंडली सॉफ्टवेअर ही सेवा निशुल्क पुरवतात. अगदी ख्यातनाम ज्योतिषी किंवा संस्थानाद्वारे ₹१९९ ते ₹९९९ मध्ये दिली जाणारी तुमच्या संपूर्ण जीवनाची ३५० पानांची रंगीत कुंडलीसुद्धा अशाच एखाद्या फ्री किंवा प्रीमियम सॉफ्टवेअरद्वारे बनवलेली असते आणि त्यामधील ज्योतिषीय विश्लेषण हे बहुतांशवेळा सॉफ्टवेअरद्वारे निर्माण केलेले असते. तुमच्याकडे स्वतःच्या किंवा मुलांच्या जन्माची नोंद असावी हा हेतू असेल, तर तुम्ही या प्रकारची सेवा नक्कीच वापरून पाहू शकता.

तुम्हाला जर कुंडली बनवण्यासाठी पैसे खर्च करायचे नसतील तर, “Free Online Kundli Report” असे गुगलवर सर्च करून येणाऱ्या रिझल्ट्समधून कोणत्याही एका वेबसाईटला भेट द्या. त्या वेबसाईटवर तुमचे नाव, तुमची जन्मतारीख, जन्मवेळ, आणि जन्मठिकाण इत्यादी माहिती दिल्यानंतर काही वेळातच तुम्हाला तुमची जन्मकुंडली आणि काही पानांचे ज्योतिषीय विश्लेषण PDF फाईलच्या स्वरूपात किंवा ई-मेलद्वारे प्राप्त करता येईल.

परंतु अशा सॉफ्टवेअरद्वारे निर्माण करून दिल्या जाणाऱ्या PDF रिपोर्ट्सने आणि उथळ स्वरूपात मिळणाऱ्या ज्योतिषीय विश्लेषणाने तुम्ही कंटाळून गेला असाल, तर तुम्ही नक्कीच ॐ नमः शिवाय ज्योतिष संस्थानतर्फे प्रदान केल्या जाणाऱ्या ज्योतिषीय सेवा बुक करू शकता.

ॐ नमः शिवाय ज्योतिष संस्थानतर्फे जन्मकुंडली विश्लेषण करण्याची पद्धत

आमची जन्मकुंडली विश्लेषण करण्याची पद्धत अतिशय साचेबद्ध आहे, जेणेकरून आम्ही येणाऱ्या प्रत्येक जातकाला अतिशय समाधानकारक मार्गदर्शन करू शकतो. १००% समाधानी जातक हीच आमच्या कामाची खरी पावती आहे.

या वेबपेजवर ‘जातक’ हा शब्द वारंवार वापरला आहे. या शब्दाचा अर्थ ज्या व्यक्तीच्या कुंडलीचे विश्लेषण करायचे आहे, ती व्यक्ती.

१. जन्मकुंडली विश्लेषण करण्यासाठी सर्वांत प्रथम आम्ही जातकाचे (ज्या व्यक्तीच्या कुंडलीचे विश्लेषण करायचे आहे) नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, आणि जन्मठिकाण इत्यादी माहिती, आणि त्यासाठी आकारले जाणारे शुल्क यांची पूर्तता करण्यास सांगतो. यासंबंधित सविस्तर माहिती खाली दिली आहे.

२. त्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आणि जीवनातील प्रमुख घटनांसंबंधी (उदा. शिक्षण, विवाह, संततीप्राप्ती, परदेशगमन, अपघात) माहिती जातकाकडून घेतली जाते. या सर्व माहितीचा उपयोग जातकाची जन्मवेळ निर्धारित करण्यासाठी किंवा अचूक जन्मवेळ शोधण्यासाठी केला जातो. बहुतांश ज्योतिषी आणि सॉफ्टवेअर तुम्ही दिलेल्या जन्मवेळेनुसार कुंडली विश्लेषण करतात. परंतु आमच्या अभ्यासात असे आढळले आहे कि ९९% व्यक्तींच्या नोंद केलेल्या जन्मवेळेमध्ये १ सेकंड ते अगदी १२-१५ मिनिटांपर्यंत त्रुटी असतात, ज्यामुळे ज्योतिषीय विश्लेषण १००% पर्यंत चुकू शकते.

*याचे प्रमुख कारण असे आहे कि बाळाच्या (व्यक्तीच्या) जन्माच्या वेळी मातृत्व कक्षात (Maternity Home) साधारणतः प्रचंड वर्दळ किंवा गडबड असते. अगदी खासगी रुग्णालये व प्रसूती गृहांमध्येसुद्धा रुग्ण, डॉक्टर्स आणि नर्सेसची धावपळ असते. अशावेळी अगदी सेकंदांपर्यंत अचूक जन्मवेळ नोंदवणे खूप अवघड असते. तसेच मूल जन्माला आल्यानंतर त्याचा स्वतंत्र पहिला श्वास हीच त्याची खरी जन्मवेळ मानली जाते. (कारण जसे शेवटचा श्वास म्हणजे मृत्यू, तसेच पहिला श्वास म्हणजे जन्म असे मानले पाहिजे. काही ज्योतिषी बाळ योनीतून बाहेर येण्याची वेळ किंवा नाळ कापल्याची वेळ ही जन्मवेळ म्हणून गृहीत धरतात. मात्र या दोन्ही गोष्टी तर्कसंगत न वाटल्यामुळे आम्ही बाळाचा पहिला श्वास म्हणजेच जन्मवेळ असे निर्धारित करतो).

महत्त्वाची सूचना: जातकाच्या जीवनातील प्रमुख घटना (उदा. शिक्षण, विवाह, संततीप्राप्ती, परदेशगमन, अपघात) आणि कुटुंबातील सदस्य इत्यादी सर्व माहितीचा उपयोग जातकाची जन्मवेळ निर्धारित करण्यासाठी किंवा अचूक जन्मवेळ शोधण्यासाठी केला जातो. त्यामुळे “आम्ही तुम्हाला पैसे दिले ना? तुम्ही ज्योतिषी ना? मग तुम्हीच सर्व सांगायचे!” “तुमची फी खूप जास्त आहे,” “तुम्ही आम्हालाच आमच्याबद्दल सर्व माहिती विचारणार, तर तुम्हाला फी का द्यायची, मग तुम्ही कसले ज्योतिषी? असे प्रश्न विचारून आपल्या उथळपणाचे व सुमार बुद्धीचे प्रदर्शन करणाऱ्या जातकांच्या कुंडलीचे विश्लेषण आम्ही करत नाही. अशा व्यक्तींना समोरच्या व्यक्तीच्या ज्ञानाची, अनुभवाची, आणि वेळेची किंमत नसते, असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते. त्यामुळे त्यांनी आमच्याकडे येऊन स्वतःचा आणि आमचा अमूल्य वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नये. अन्यथा दिलेले शुल्कसुद्धा परत केले जाणार नाही आणि आपले संभाषण/टिपण्या पुराव्यासहित सोशल मीडिया वर प्रकाशित केले जाईल.

३. जन्मवेळ निर्धारित केल्यांनतर, जन्मठिकाणचे अचूक अक्षांश व रेखांश (Latitude and Longitude) निर्धारित केले जातात. बऱ्याच वेळेला जातक ‘माझे जन्म स्थळ पुणे आहे’ असे सांगून मोकळे होतात. मात्र पुणे या शहरातीलच हडपसर, कोरेगाव पार्क, डोणजे, पुणे कॅम्प, बिबवेवाडी, कोथरूड, विमाननगर, इत्यादी सर्व ठिकाणचे अक्षांश व रेखांश वेगवेगळे आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी व्यक्तीचा जन्म झाला ते ठिकाण किंवा हॉस्पिटलचे अचूक अक्षांश व रेखांश आम्ही निर्धारित करतो. जितकी अचूक माहिती इनपुट म्हणून दिली जाईल तितक्या प्रमाणात आउटपुटची अचूकता जास्त असणार हे ओघाने आले.

४ . या सर्व माहितीच्या आधारे, आम्ही जातकाची अचूक जन्मवेळ निर्धारित करण्याचा प्रयत्न करतो. जन्मवेळ शुद्धीकरण (Birth Time Rectification) ही अतिशय वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया असल्यामुळेच आम्ही जन्मकुंडली विश्लेषण करण्यासाठी इतर ज्योतिषांपेक्षा जास्त शुल्क आकारतो. कारण यासाठी खूप वेळ, मेहनत, महागडे सॉफ्टवेअर इत्यादी गोष्टींची आवश्यकता असते. उदा. जन्मवेळ शुद्धीकरण प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या केवळ एका सॉफ्टवेअरची किंमत तब्बल ₹१८००० इतकी आहे. याव्यतिरिक्त कुंडली विश्लेषण करण्यासाठी लागणारा वेळ, एक ज्योतिषी बनण्यासाठी लागणारा वेळ व शिकण्यासाठी होणारा खर्च, इंटरनेट, संगणक, अन्य सॉफ्टवेअर्स इत्यादी गोष्टींचे खर्चसुद्धा असतात. त्यामुळे ₹१००-२०० किंवा ₹५०० शुल्क घेऊन जन्मवेळ शुद्धीकरण आणि कुंडली विश्लेषण करणे व्यावहारिकदृष्ट्या अतिशय अवघड आहे, याची सर्वानी नोंद घ्यावी. जर तुम्हाला या गोष्टींची उपयुक्तता वाटत नसेल, तर तुम्ही इतर ज्योतिष तज्ञांकडून सल्ला घेऊ शकता, जे अत्यंत माफक शुल्क घेऊन पत्रिका बघतात.

५. जन्मवेळ शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण झाली की जातकाच्या कुंडलीचे व्हॉट्सॲप (WhatsApp), व्हिडिओ कॉल (Zoom/Google Meet), किंवा नॉर्मल कॉलद्वारे विश्लेषण केले जाते आणि त्यावेळी येणाऱ्या ज्योतिषीय प्रश्नांची उत्तरे दिली जातात. अल्पवयीन मुलांच्या बाबतीत हे जन्मकुंडली विश्लेषण (Consultation) त्यांच्या पालकांसोबत केले जाते. आमचा प्रयत्न असतो कि प्रत्येक जातकाला त्याच्या ज्योतिषीय प्रश्नांची अतिशय समाधानकारक आणि शास्त्रसुसंगत उत्तरे मिळावी. परंतु ज्योतिषीसुद्धा एक व्यक्ती असतो आणि तो कोणत्याही जातकाचे नशीब १००% बदलू शकत नाही. आमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःच्या कर्मानेच त्याचे आयुष्य सकारात्मकरित्या किंवा नकारात्मकरित्या बदलू शकतो, हे जातकाने लक्षात ठेवले पाहिजे.

६. कुंडली विश्लेषणाच्या आधारे विविध समस्यांवर आम्ही जातकाला ज्योतिषीय उपाय सुचवतो. ज्यामध्ये तुमचे जीवनमान (Lifestyle) व कर्म सुधारणे हाच प्रमुख उपाय असतो. केवळ आवश्यक असेल तर, उपासना, पूजा-अर्चा, रत्न, आणि आजारी व्यक्तींसाठी मेडिकल ज्योतिष पद्धतीनुसार फायदेशीर गोष्टी सुचवतो, ज्या अंमलात आणणे हा सर्वस्वी जातकाचा निर्णय असतो. तुमच्या कुंडलीत मंगळदोष आहे अथवा कालसर्पदोष आहे म्हणून अमुक पूजा करा, या ग्रहाच्या शांतीसाठी तमुक रत्न घाला, किंवा तुमच्या वास्तूमध्ये कोणतातरी दोष आहे, त्यात तोडफोड करून ते व्यवस्थित केल्याशिवाय तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, असा भीती घालण्याचा प्रकार आम्ही करत नाही. त्यासाठी तुम्ही इतर ठिकाणी भेट देऊ शकता.

७. रत्न मार्गदर्शन घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींनी लक्षात घ्यावे कि या अगोदर नमूद केलेली जन्मवेळ शुद्धीकरण आणि कुंडली विश्लेषण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच जातकाला त्याच्या शिक्षण, विवाह, संतती, नोकरी-व्यवसाय, भाग्यवृद्धी, परदेशगमन, आरोग्य, एकाग्रता, व कोणत्याही कामातील, उदा. कोर्टकचेरीतील यश, इत्यादी गोष्टींसाठी रत्न सुचवले जाऊ शकते. त्यामुळे यासाठी आम्ही कुंडली विश्लेषण सेवेप्रमाणे पूर्ण शुल्क आकारतो.

८ . केवळ आवश्यक असेल तरच महत्त्वाच्या गोष्टी PDF रिपोर्टच्या स्वरूपात व्हॉट्सॲप (WhatsApp) किंवा ई-मेलद्वारे दिल्या जातील. कॉलवरील पूर्ण संभाषण किंवा कुंडली विश्लेषण लिहून द्या, असा अट्टाहास कोणीही करू नये. कारण त्यासाठी खूप वेळ खर्च होतो. तसेच याआधी नमूद केल्याप्रमाणे आम्ही सॉफ्टवेअरने निर्माण केलेले रिपोर्ट्स आम्ही “कुंडली विश्लेषण” या सेवेमध्ये अंतर्भूत केलेले नाहीत. मात्र कोणाला संग्रही ठेवण्यासाठी (विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत) किंवा विवाह जुळवताना वधु-वरांना पाहिजे असेल, तर प्रीमियम ज्योतिषीय सॉफ्टवेअरद्वारे तयार केलेली मराठी भाषेतील कुंडली अतिरिक्त शुल्कासहित उपलब्ध आहे. ही कुंडलीसुद्धा PDF फॉरमॅट मध्ये असेल. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात हस्तलिखित कुंडलीच द्या, असा आग्रह करू नये. संगणकीय प्रणालीद्वारे केलेली गणना (Calculation) आणि कुंडली अतिशय अचूक असते, मात्र त्या कुंडलीचे सुयोग्य विश्लेषण करणे हे ज्योतिषाचे ज्ञान, कौशल्य, अनुभव आणि त्याची साधना (दैवी कृपाशीर्वाद) यावर आधारित असते.

आमच्या लोकप्रिय ज्योतिषविषयक सेवा

प्रेमसंबंध, विवाह, घटस्फोट, आरोग्य, मुलांचे शिक्षण, करिअर, अपत्यप्राप्ती, परदेशगमन, आणि आर्थिक प्रगतीसाठी सर्वोत्तम ज्योतिष सेवा

आमच्या लोकप्रिय ज्योतिष सेवा खाली सूचीबद्ध केल्या आहेत. यामधील प्रत्येक सत्र (Consultation Session) तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास, आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास आणि तुमच्या आयुष्यात अधिक शांती आणि समतोल आणण्यास मदत करते.

स्लॉट्स अत्यंत मर्यादित आहेत! त्यामुळे तुमचे Consultation त्वरित बुक करा! ⏳

जन्मवेळ शुद्धीकरण (Birth Time Rectification)

जर तुमच्या जन्मवेळेबद्दल तुम्हाला १००% खात्री नसेल किंवा यापूर्वी तुम्ही कधी जन्मवेळ शुद्धीकरण केले नसेल, तर तुमच्या नोंद केलेल्या आणि प्रत्यक्ष जन्मवेळेमध्ये कमीत कमी १ सेकंद ते १० मिनिटे किंवा त्याहूनही जास्त फरक (त्रुटी) असण्याची दाट शक्यता आहे. बहुतांश जातक आणि पारंपरिक ज्योतिषी या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करतात आणि कुंडली विश्लेषण करतात, जे अत्यंत चुकीचे आहे.

साधारणपणे पारंपरिक ज्योतिषी फक्त लग्न, राशी, ग्रह स्थिती, नक्षत्र, आणि योग पाहतात. त्यांच्या मते २ तासांनी लग्नभावातील रास बदलत असल्यामुळे जन्मवेळेत ५-१० मिनिटांचा बदल झाला असेल तर भविष्यकथनात किंवा फलादेशात फारसा फरक पडत नाही.

काही तज्ञ ज्योतिषी ग्रह अंश, नक्षत्र आणि जन्मकुंडलीव्यतिरिक्त इतर कुंडल्या पाहत असले, तरी मुळातच पारंपरिक ज्योतिषशास्त्रात १-२ सेकंदापर्यंत अचूकतेने जन्मवेळ शुद्धीकरण करण्याची पद्धत अस्तित्त्वात असल्याचे मला तरी ज्ञात नाही.

पारंपरिक जन्मवेळ नोंदींमध्ये दोन प्रमुख समस्या आहेत.

१. बहुतेक लोकांना अचूक जन्मवेळ माहित नसते:

सर्वसाधारणपणे तुम्हाला अशी परिस्थिती आढळेल:

  • आईला अंदाजे वेळ आठवते: “रात्री १० वाजता”
  • जन्म दाखल्यावर (Birth Certificate वर) रात्री ११.३० वाजता असे लिहिले आहे. (Round Figure)
  • तुझा जन्म हॉस्पिटलमध्ये: “संध्याकाळी ७-८ दरम्यान” झाला, असे आई सांगते.
  • घरी सर्वजण बोलतात तुझा जन्म: “सूर्यास्ताच्या वेळी” झाला.

समस्या: हे सर्व अंदाज आहेत, अचूक जन्मवेळा नाहीत.

२. घड्याळांची अचूकता:

विचार करा:

  • १९८०-९० च्या दशकात किती लोकांकडे अचूक घड्याळ होते?
  • हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आणि नर्सेस इत्यादी स्टाफ जन्मवेळ नोंदीसाठी कधी घड्याळ बघतात?
  • आई प्रसूतीच्या वेदनेत असते, तर मग तिला मुलाच्या जन्माची वेळ कशी लक्षात राहणार किंवा त्या वेदना सहन करत ती खरोखरच जन्मवेळ नोंद करू शकते का?
  • बहुतेकदा नर्सेस किंवा हॉस्पिटलमधील स्टाफसुद्धा “अंदाजे वेळ” लिहितात. उदा. (९.४३ ऐवजी ९.४५)

समस्या: तुमच्या जन्मवेळेच्या नोंदीत आणि प्रत्यक्ष जन्मवेळेत १ सेकंद ते १० मिनिटे किंवा त्याहूनही जास्त फरक असू शकतो.

केपी ज्योतिषशास्त्रानुसार फलादेश करण्यासाठी उपनक्षत्र स्वामी (Cuspal Subloard) आणि उप-उपनक्षत्र स्वामी (Cuspal Sub-Subloard) हे पायाभूत घटक आहेत. मात्र केवळ एका सेकंदाच्या फरकानेसुद्धा त्यामध्ये बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या कुंडलीनुसार अचूक भविष्यवाण्यांसाठी तुमची जन्मवेळसुद्धा अतिशय अचूक असणे आवश्यक ठरते, जेणेकरून तुम्हाला मिळणारे प्रत्येक ज्योतिष मार्गदर्शन विश्वसनीय आणि तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

समजा तुमची नोंद केलेली जन्मवेळ सकाळी १०:३० आहे:

ज्यानुसार सप्तम (विवाह) भावाचा उपनक्षत्र स्वामी (Cuspal Subloard) शुक्र (Venus) असेल आणि तो २, ५, ७, ११ भावांचा कार्येश होत असेल तर आपण सहज म्हणून शकतो कि योग्य वयात विवाह होईल तसेच सुंदर जोडीदार मिळेल.

पण प्रत्यक्ष जन्मवेळ सकाळी १०:३०:४५ आहे: (फक्त ४५ सेकंद फरक)

ज्यानुसार सप्तम (विवाह) भावाचा उपनक्षत्र स्वामी (Cuspal Subloard) शनी (Saturn) असेल आणि तो १, ४, ६, ८, १०, १२ भावांचा कार्येश होत असेल तर मात्र लग्नाला विलंब होईल, अडचणी येतील, किंवा दांपत्य विजोड असेल. उभयतांच्या वयामध्ये जास्त अंतर असू शकेल. वाईट परिस्थितीमध्ये वैवाहिक विभाजनासारखी (घटस्फोट) समस्या निर्माण होऊ शकते.

पाहिलेत? फक्त ४५ सेकंदांनी जन्मवेळ बदलली तर संपूर्ण भविष्यवाणी उलटी होते! 😱

या कारणामुळेच जन्मवेळ शुद्धीकरण अतिशय आवश्यक ठरते.

जन्मकुंडली विश्लेषण (Birth Chart Analysis)

तुमच्या आयुष्याचे रहस्य उलगडण्याची वेळ आली आहे! 🔮

तुमचे आयुष्य सध्या एका प्रश्नचिन्हासारखे वाटते आहे का?

किंवा
👉 “स्थिरस्थावर असूनही माझ्या लग्नाला उशिर का होत आहे?”
👉 “मी व माझी पत्नी शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असूनही आम्हाला अपत्य का होत नाही?”
👉 “करिअरमध्ये वारंवार अडथळे का येतात?”
👉 “इतके प्रयत्न करूनही यश मिळत नाही, नेमके कारण काय?”

असे अनेक प्रश्न तुमच्या मनात दररोज येत असतील, तर त्यांचे उत्तर एका ठिकाणी आहे: तुमच्या स्वतःच्या कुंडलीत.

पण खरी समस्या अशी आहे की बहुतेक लोकांची कुंडली चुकीच्या पद्धतीने वाचली जाते. साधारण ज्योतिषी फक्त ग्रह, राशी, भाव आणि नक्षत्र पाहून “तुमचे भविष्य अमुक-तमुक असेल” असे सांगतात. खरेतर ते फक्त वरवरचे भविष्य सांगतात, तुमच्या समस्येचे मूळ कारण सांगत नाही.

या सर्वाचा परिणाम?
❌ चुकीचे भविष्यकथन
❌ गोंधळात टाकणारं मार्गदर्शन
❌ निर्णय घेण्यात भीती आणि अनिश्चितता

अशा वेळी केपी ज्योतिषपद्धतीनुसार केले जाणारे ‘कुंडली विश्लेषण’ तुमचे जीवन बदलू शकते.

जर तुम्ही या आधी अनेक ठिकाणी कुंडली पहिली असेल, पण आयुष्यात काहीच बदल झाला नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या सखोल केपी पद्धतीनुसार कुंडली विश्लेषणाचा लाभ घेतला पाहिजे.

आम्ही तुमच्या जन्मकुंडलीतील प्रत्येक ग्रह, भाव, राशी, त्यांचे एकमेकांसोबतचे संबंध, ग्रहदृष्टी, अंशात्मक अंतर, नक्षत्र, उपनक्षत्र स्वामी, उप-उपनक्षत्र स्वामी, दशा आणि अंतर्दशांचा सखोल अभ्यास करतो. याशिवाय जातकाचे पूर्वायुष्य, सध्याची शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आर्थिक, सामाजिक, वैचारिक, आणि आध्यात्मिक परिस्थिती यांचे सर्वांगीण अवलोकन करून अतिशय पारदर्शक पद्धतीने कुंडली विश्लेषण करतो.

या सूक्ष्म निरीक्षणातून स्पष्ट कळते:

  • कोणता ग्रह किंवा भाव तुमच्या आयुष्यात अडथळा निर्माण करत आहे?
  • तुम्हाला कोणत्या काळात व किती प्रमाणात यश मिळेल?
  • प्रगती साधण्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करावे?
  • आपल्या आयुष्यात कोणते बदल केल्यासआर्थिक स्थिती, आरोग्य, आणि एकंदरीत जीवनमान सुधारेल?
पारंपरिक कुंडली विश्लेषणकेपी कुंडली विश्लेषण
ग्रह, नक्षत्र, भाव, आणि राशीवर आधारितउपनक्षत्र, उप-उपनक्षत्र, आणि त्यांच्या कार्यभावांवर आधारित
एकाच राशी/नक्षत्रासाठी समान विश्लेषणप्रत्येक व्यक्तीसाठी वैयक्तिक आणि अद्वितीय विश्लेषण
“आयुष्यात काय होईल” याचे ढोबळ अनुमान“जन्मपासून मृत्यूपर्यंत प्रत्येक महत्त्वाची घटना कधी, का आणि कशामुळे होईल” याचे अतिशय सविस्तर विवेचन
तुलनेने किचकट (हजारो योग आणि अनेक सहाय्यक कुंडल्या), मात्र फलादेश कमी वेळात करत असल्यामुळे साधारणतः कमी दक्षिणा घेऊन एकाच दिवसात अनेक जातकांना मार्गदर्शन केले जाते.अतिशय अचूक जीवन मार्गदर्शन मिळते परंतु संपूर्ण विश्लेषण करण्यासाठी वेळ, कौशल्य आणि अनुभव आवश्यक असल्यामुळे तुलनेने जास्त शुल्क आकारले जाते.

🔍 कुंडली विश्लेषणातून तुम्हाला काय मिळेल:

✅ तुमच्या आयुष्यातील प्रमुख घटनांचा नेमका कालावधी
✅ शिक्षण, करिअर, विवाह, पैसा, आरोग्य आणि विदेशगमनासंबंधी स्पष्ट दिशादर्शन
✅ सध्याच्या अडचणींचे मूळ कारण आणि त्यावर व्यावहारिक उपाय
✅ योग्य काळात योग्य निर्णय घेण्यासाठी आत्मविश्वास

💎 लक्षात घ्या केपी पद्धतीनुसार कुंडली विश्लेषण हे फक्त भविष्यकथन नव्हे तर जीवन समजून घेण्याचे सर्वोत्तम साधन आहे.

प्रत्येक ग्रह तुमच्यासाठी काही संदेश घेऊन आला आहे. तो संदेश योग्य पद्धतीने समजून घेतला, तर तुम्ही आयुष्यातील प्रत्येक अडथळा लीलया पार करू शकता.

त्यामुळे आता अंदाजावर नाही, तर अचूकतेवर विश्वास ठेवा.

आजच तुमचं वैयक्तिक कुंडली विश्लेषण बुक करा आणि तुमच्या भविष्याचं रहस्य स्वतः उलगडा करा. 🌙

✨ या सत्रात काय समाविष्ट आहे:

✅ सविस्तर जन्मकुंडली अभ्यास (ग्रह, राशी, भाव, उपनक्षत्रांसह)
✅ विवाह, करिअर, आरोग्य, विदेशगमन आणि संपत्ती यांचे सखोल विश्लेषण
✅ चालू दशा-अंतर्दशेनुसार अपेक्षित घटनेचा नेमका कालावधी
✅ तुमच्या सध्याच्या अडचणींची मूळ कारणे आणि त्यावर वैयक्तिक उपाय
✅ वैयक्तिक Zoom/Call सत्र किंवा टेलिफोनिक संवाद

जीवनात प्रत्येक क्षण महत्वाचा असतो आणि चुकीच्या वेळी किंवा उशिराने घेतलेला निर्णय अनेकदा आपल्याला खूप वर्षे मागे नेतो. त्यामुळे तुमचे भविष्य “अंदाजावर” सोडू नका.

आजच तुमचं वैयक्तिक कुंडली विश्लेषण सत्र बुक करा आणि जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय रहस्य दडली आहेत. या महिन्यात फक्त काही लोकांसाठी मर्यादित स्लॉट्स खुले आहेत.

रत्न मार्गदर्शन (Gemstone Consultation)

आयुष्याचे संतुलन साधण्यासाठी आणि आरोग्य, धन, विवाह, संतती, शिक्षण, करिअर तसेच नातेसंबंधांविषयी गोष्टींमध्ये यश मिळवण्यासाठी तुमच्या कुंडलीनुसार योग्य रत्न धारण करणे हितावह ठरते.

रत्न मार्गदर्शन (Gemstone Consultation) ही एक विशेष सेवा आहे जिथे ज्योतिषी तुमच्या जन्मकुंडलीचे सखोल विश्लेषण करून तुम्हाला कोणते रत्न किंवा उपरत्न धारण करावे याबद्दल मार्गदर्शन किंवा वैयक्तिक शिफारस करतो.

रत्न का धारण केले जाते?

रत्न-ज्योतिषशास्त्रानुसार:

  • प्रत्येक ग्रहाशी संबंधित एक मुख्य रत्न आणि इतर उपरत्ने आहेत, ज्यांचा वापर त्या ग्रहाच्या वैश्विक ऊर्जेचे आपल्या जीवनात संतुलन राखण्यासाठी केला जातो. उदा. चंद्राशी संबंधित मुख्य रत्न मोती असून, चंद्रमणी हे उपरत्न आहे.
  • जर तुमच्या कुंडलीत एखादा ग्रह कमकुवत आहे किंवा अशुभ स्थितीत असेल, तर त्यासाठी रत्न काही अंशी फायदेशीर ठरू शकतात.
  • कुंडलानुसार मूळ त्रिकोण राशीतील ग्रहाचे रत्न घालल्याने त्या ग्रहाची सकारात्मक ऊर्जा मिळते.
  • आरोग्यविषयक समस्या असतील तर योग्य रत्न धारण केल्याने खूप दिलासा मिळतो.
  • करिअर, नोकरी-व्यवसाय, आणि आर्थिक सुबत्ता येण्यासाठी रत्न वापरणे अतिशय शुभ मानले जाते. उदा. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी-कुंद्रा, यो यो हनी सिंग, प्रियांका चोप्रा, नीता अंबानी अशा अनेक ख्यातनाम व्यक्ती व तारका उच्च प्रतीची ओरिजिनल रत्न वापरताना दिसून येते.

नवग्रहांनुसार खालील रत्ने धारण करतात, मात्र तज्ञ ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय रत्न वापरणे धोकादायक ठरू शकते याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे.

  • सूर्य (Sun): माणिक (Ruby) → करिअर, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, शासकीय किंवा राजकीय कामात यश
  • चंद्र (Moon): मोती (Pearl) → मानसिक शांती आणि आईसोबतचे नाते सुदृढ करण्यासाठी
  • मंगळ (Mars): पोवळे/मूंगा (Coral) → साहस, ऊर्जा, संपत्ती
  • बुध (Mercury): पाचू/पन्ना (Emerald) → बुद्धी, व्यवसाय, संवाद, निर्णयक्षमता
  • गुरु (Jupiter): पुष्कराज (Yellow Sapphire) → नशीब, ज्ञान, संपत्ती
  • शुक्र (Venus): हिरा (Diamond) → प्रेम, विलासिता, कला, विवाह, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारामध्ये दिलासा
  • शनी (Saturn): नीलम (Blue Sapphire) → अडचणी दूर करण्यासाठी आणि करिअर स्थिरतेसाठी
  • राहू: गोमेद (Hessonite) → अनपेक्षित लाभ, ऑनलाईन मीडिया व इंटरनेटद्वारे लाभ
  • केतू: वैदूर्य/लसण्या (Cat’s Eye) → आध्यात्मिकता, बाहेरची बाधा दूर करण्यासाठी

रत्न मार्गदर्शन (Gemstone Consultation) प्रक्रिया कशी आहे?

१. कुंडली विश्लेषण:

  • तुमच्या कुंडलीत कोणते ग्रह मजबूत (अंशात्मक बलाबल/षड्बल, इत्यादी) आहेत?
  • कोणते ग्रह अस्त, वक्री किंवा कमकुवत आहेत?
  • कोणते ग्रह तुमच्यासाठी फायदेशीर (beneficial) आहेत
  • कोणते ग्रह नुकसानकारक (malefic) आहेत
  • मारकेश आणि बाधकेश कोणते ग्रह आहे, त्यांची शुभाशुभ तीव्रता किती आहे?
  • कोणते ग्रह त्यांच्या मरण कारक स्थानात आहेत?
  • कोणते ग्रह ६,८,१२ भावांमध्ये किंवा त्या भावांचे स्वामी आहेत?
  • कोणते ग्रह अशुभ समजल्या जाणाऱ्या ग्रहांच्या युतीत किंवा दृष्टीत आहेत?

२. योग्य रत्न शिफारस:

  • तुमच्यासाठी एकंदरीत आणि सध्याच्या समस्येनुसार कोणते रत्न सर्वोत्तम आहे?
  • किती कॅरेट/रत्तीचे (carat/weight) रत्न धारण करावे?
  • कोणत्या धातूत (सोने, चांदी, पंचधातू) रत्न घालावे?
  • कोणत्या हातात आणि नेमके कोणत्या बोटात रत्न वापरावे?
  • कोणत्या दिवशी रत्न धारण करावे?
  • कोणत्या वेळी (मुहूर्त) रत्न धारण करावे?

३. सावधगिरी:

  • चुकीचे रत्न धारण केले तर उलट परिणाम होऊ शकतो. उदा. जर शनी तुमच्यासाठी अशुभ फळ देत असेल आणि तुम्ही नीलम घातला, तर मोठे नुकसान होऊ शकते. म्हणूनच योग्य ज्योतिषीय सल्ला अत्यंत आवश्यक असतो.
  • राशींनुसार नव्हे तर समस्या उद्भवत असेल किंवा कोणती इच्छा पूर्ण करायची असेल त्यानुसार केवळ सखोल कुंडली विश्लेषण करूनच रत्न घालावे. महागडे रत्न खरेदी करणे अनिवार्य नाही. मात्र रत्न ओरिजिनल, योग्य वजनाचे आणि सिद्ध केलेले असावे. धारण केल्यानंतर त्या रत्नासंबंधित ग्रह किंवा देवतेची किमान १० मिनिटे तरी नित्य उपासना करावीच.
  • फक्त प्रतिष्ठित लॅबद्वारे प्रमाणित (certified) रत्न खरेदी करा. नकली रत्नांचा फायदा होत नाही.
  • रत्न बऱ्याच अंशी कलर थेरपी तत्त्वांनुसार वैश्विक किरणांद्वारे सप्त चक्रांची ऊर्जा संतुलित करून आपल्याला शुभाशुभ परिणाम देतात. मात्र रत्नांच्या दैवी शक्तीवर विश्वास किंवा श्रध्दा असल्याशिवाय खूप सकारात्मक परिणामांची अपेक्षा करू नये.

रत्नांचे फायदे:

१. आरोग्य (Health):

  • मानसिक शांती
  • शारीरिक ऊर्जा वाढवणे
  • विशिष्ट आजारांत आराम (Healing or Speedy Recovery)

२. संपत्ती (Wealth):

  • व्यवसायात वाढ
  • आर्थिक स्थिरता
  • अनपेक्षित लाभ

३. नातेसंबंध (Relationships):

  • वैवाहिक सुख
  • प्रेमसंबंध सुधारणे
  • कौटुंबिक सलोखा

४. करिअर:

  • नोकरीत प्रगती आणि प्रमोशनसाठी
  • नोकरीच्या ठिकाणी राजकारण होत असल्यास (Office Politics)
  • नवीन संधी मिळवण्यासाठी
  • शासकीय किंवा राजकीय कामात यश मिळवण्यासाठी

कुंडली मिलन (Kundali Matching)

विवाह हा फक्त दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन आत्म्यांचा, दोन कुटुंबांचा आणि दोन नशिबांचा संगम असतो.
म्हणूनच, “योग्य जोडीदाराची निवड” ही आयुष्यभराच्या सुख-दुःखावर परिणाम करणारी सर्वात महत्त्वाची निवड ठरते.

पण अनेक वेळा विवाह झाल्यानंतर नात्यांमध्ये अनेक समस्या निर्माण होतात, उदा.
👉 पती-पत्नीमधील वैचारिक मतभेद वाढतात आणि वैवाहिक नात्यात असह्य तणाव निर्माण होतो..
👉 जोडीदारांपैकी एक जण प्रचंड आजारी असल्यामुळे वैवाहिक संबंध सुखकर राहत नाहीत.
👉 आर्थिक, मानसिक आणि भावनिक असमतोल निर्माण होतो.

याचं मूळ कारण म्हणजे कुंडली मिलन योग्य पद्धतीने झालेले नसते.

⚠️ पारंपरिक गुणमिलन करण्यातील समस्या

बहुतेक ठिकाणी कुंडली मिलन म्हणजे फक्त गुणमेलन (३६ गुणांपैकी कमीत कमी १८ गुण जुळले पाहिजे) एवढेच मानले जाते. पण सत्य असे आहे की,
✅ जरी गुणमिलनात १८ पेक्षा जास्त गुण आले, तरी वैवाहिक नाते टिकेलच याची खात्री देता येत नाही.
✅ काही वेळा गुण कमी आले आणि जोडीदारांनी एकमेकांना सुखदुःखात साथ दिली, तर नाते कायम टिकून राहते व दांपत्य अत्यंत सुखी आयुष्य व्यतीत करते.

कारण विवाहसंगती गुणांमध्ये नाही, तर ग्रहांच्या ऊर्जांमध्ये आणि भावसंबंधांमध्ये दडलेली असते.

केपी पद्धतीनुसार कुंडली मिलन करताना आम्ही फक्त गुणमेलन करत नाही, तर पुढील सर्व घटकांचा सूक्ष्म अभ्यास करतो:

🔹 दोन्ही व्यक्तींच्या लग्न, चंद्र, आणि नवांश कुंडलींचा तुलनात्मक अभ्यास
🔹 विवाहभाव, सप्तमेश, शुक्र आणि गुरु ग्रहांचा परस्पर संबंध
🔹 पारंपरिक पद्धतीने गुणमिलन, नाडी दोष, भकूट दोष, गण व ग्रहमैत्री, इत्यादी (कारण केपी ज्योतिष पद्धतीनुसार कितीही अचूक विश्लेषण केले तरी काहीजण उभयतांच्या पत्रिकांमध्ये किती गुण जुळतात हा प्रश्न तुम्हाला १००% विचारणारच)
🔹 विवाहानंतरचे संभाव्य तणाव, विवाहास विलंब, किंवा वैवाहिक सौहार्द (Marital Harmony)
🔹 दोघांच्या ग्रहदशांनुसार विवाहाचा शुभ काळ (दशा) आणि योग्य दिशा
🔹 विभक्त योग (घटस्फोट, नोकरी, परदेशगमन, आजार किंवा मृत्यूमुळे एकमेकांपासून दुरावा)
🔹 मानसिक, शारीरिक आणि भावनिक अनुरूपता (Compatibility Analysis)
🔹 एकमेकांप्रती ओढ, प्रेम, जिव्हाळा आणि आदर
🔹 जोडीदाराचे आयुष्यमान, अपघातांची शक्यता, शारीरिक व मानसिक आरोग्य, आणि गंभीर आजारांची शक्यता
🔹 विवाहानंतरचे आर्थिक स्थैर्य
🔹 हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ होण्याची शक्यता
🔹 संततीप्राप्तीची शक्यता (वंशवृद्धी)
🔹 सासरच्या मंडळींसोबतचे नातेसंबंध
🔹 कुंडलीतील मंगळ योग आणि कालसर्प योग (दोन्ही योगांना घाबरण्याची अजिबात गरज नाही)
🔹 सर्पदोष, पितृदोष किंवा पूर्वकर्मानुसार वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या
🔹 विवाहबाह्य संबंध निर्माण होण्याची व त्यामुळे बदनामी होण्याची शक्यता
🔹 कुंडलीनुसार वैवाहिक सुखात बाधा आणणाऱ्या गोष्टींवर साधे आणि व्यावहारिक उपाय

हे विश्लेषण केवळ विवाह होईल का हे सांगत नाही, तर तो कधी, कोणासोबत होईलआणि कशा प्रकारचे नाते टिकाऊ ठरेल” हे स्पष्ट करते.

त्यामुळे तुमचा जीवनसाथी निवडण्याचा निर्णय अंदाजे घेऊ नका. कारण चुकीचा जोडीदार आयुष्यभराच्या दुःखाचे कारण बनू शकतो.

तुमचे ज्योतिष सत्र बुक करण्यासाठी सज्ज आहात का?

तुम्हाला हवी असलेली ज्योतिष सेवा निवडा आणि खालील Google Pay QR कोड वापरून ₹५१०० भरा. पेमेंटनंतर, त्याचा स्क्रीनशॉट आणि तुमचे जन्म तपशील (खालीलप्रमाणे) WhatsApp क्रमांक 7276619975 वर पाठवा.

महत्त्वाची सूचना: खालील QR कोड द्वारे पेमेंट होत नसेल, तर Google Pay साठी 9767507899 हा मोबाईल क्रमांक आहे. मात्र कृपया या क्रमांकावर कॉल करून किंवा व्हॉट्सॲप (WhatsApp) द्वारे ज्योतिष सेवेसंदर्भात विचारणा करू नये. प्रत्युत्तर दिले जाणार नाही.

Ankit Main Google Pay QR Code for Astrology Consultation

जन्मकुंडली विश्लेषण करण्यासाठी खालील माहिती आवश्यक असते.

  • जातकाचे (व्यक्तीचे) नाव
  • जन्म तारीख
  • जन्म वेळ
  • जन्म ठिकाण (अचूक, उदा. शासकीय रुग्णालय, रत्नागिरी)

पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि तुमचे जन्म तपशील मिळाल्यानंतर तुम्हाला त्वरित (Almost Immediately) प्रतिसाद मिळेल. दुर्मिळ परिस्थितीत, ४८ तासांपर्यंत वेळ लागू शकतो. अशा वेळी तुम्ही 7276619975 या क्रमांकावर कॉल करून विचारणा करू शकता.

मात्र पेमेंट आणि अचूक जन्म तपशील प्राप्त झाल्याशिवाय ज्योतिष सेवेसंदर्भात कोणत्याही चौकशीच्या कॉल्सना उत्तर दिले जाणार नाही.

तुमचा वैयक्तिक डेटा आमच्याकडे सुरक्षित असणार, याबाबत तुम्ही निश्चिंत रहा. आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि तुमच्या जन्म तपशीलांना अतिशय गोपनीय ठेवतो.

प्रत्येक दिवसासाठी असणाऱ्या स्लॉट्स मर्यादित आहेत!

आम्ही तुम्हाला ज्योतिषीय मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहोत!

कुंडली विश्लेषण शुल्क परतावा धोरण (Consultation Fees refund Policy)

१. प्रत्येक जातकाने कुंडली विश्लेषण किंवा अन्य सेवांसाठी नमूद केलेले संपूर्ण शुल्क ज्योतिषीय सल्लामसलत (Consultation) सुरु होण्यापूर्वी जमा केले पाहिजे. तसेच तुम्ही गुंतवलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये परत मिळणार नाही. (All fees are 100% non-refundable). सुयोग्य मार्गदर्शन करूनसुद्धा काही व्यक्ती शुल्क (Consultation fees) देण्यास उशिर किंवा टाळाटाळ करतात, असा अनुभव भूतकाळात आलेला आहे. काही जण तर सलग ४-५ दिवस रोज १-२ तास व्हॉट्सॲप किंवा कॉलद्वारे संपूर्ण कुंडली विश्लेषण करून घेऊनसुद्धा आमची फी देत नाही. एखाद्या व्यक्तीला समस्या आहे, त्याला योग्य ज्योतिषीय मार्गदर्शन मिळावे यासाठी आम्ही वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी बाजूला ठेवून इतका वेळ देत असू आणि समोरचा माणूस त्याची किंमत करेल नसेल, तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे १००% शुल्क जमा केल्यानंतरच ज्योतिषीय सल्लामसलत (Consultation) सुरु करण्यात येईल याची सर्वानी नोंद घ्यावी.

२. हे शुल्क तुम्हाला WhatsApp किंवा कॉलद्वारे जास्तीत जास्त एका तासापर्यंत (६० मिनिटांपर्यंत) ज्योतिषीय सल्लामसलत सत्र (Consultation session) प्रदान करते. आवश्यक वाटल्यास आम्ही आमच्या विवेकबुद्धीनुसार वेळ वाढवू शकतो. मात्र हे अनिवार्य नाही, हे लक्षात घ्या.

३. या वेळेत, तुम्ही निवडलेल्या विषयाशी संबंधित एकापेक्षा अधिक प्रश्न विचारू शकता, कोणत्याही शंकांचे स्पष्टीकरण करून घेऊ शकता आणि इतर माहिती मिळवू शकता. मात्र या काळात आम्ही नम्र आणि पारदर्शक संवादाला महत्त्व देतो.

FAQs

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुमच्या मनातील प्रश्नांची योग्य उत्तरे देण्याचा आणि शंकानिरसन करण्याचा आम्ही येथे प्रयत्न केला आहे, तरीही या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही WhatsApp क्रमांक 7276619975 वर विचारू शकता. आमचा आणि तुमचाही वेळ अमूल्य आहे, त्यामुळे या वेबपेजवरील माहिती आणि प्रश्नोत्तरे यांनी समाधान झाले नाही, तरच वैयक्तिक संदेश पाठवावा.

ॐ नमः शिवाय ज्योतिष संस्थानचे संस्थापक श्री. अंकित माईण, असून त्यांना ६ वर्षांपेक्षा जास्त ज्योतिष मार्गदर्शनाचा अनुभव आहे. त्यांचा पारंपरिक पाराशरी ज्योतिषशास्त्र, केपी ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र, वास्तूशास्त्र आणि इतर अनेक ज्योतिष शाखांचा गाढा अभ्यास असून त्यांनी आतापर्यंत हजारो व्यक्तींना मार्गदर्शन करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच त्यांनी जन्मवेळ शुद्धीकरण (Birth Time Rectification) ची सर्वांत आधुनिक आणि अचूक पद्धत CSMC Theory चा शोध लावल्यामुळे अगदी सेकंदापर्यंत जन्मवेळ शोधून अचूक फलादेश करणे शक्य झाले आहे.

आम्ही ज्योतिषीय सल्ला देण्यासाठी व्हॉट्सॲप आणि कॉलद्वारे संवाद (2-Way Communication) करतो. जेणेकरून व्यक्तीला विशिष्ट विषयावर योग्य मार्गदर्शन मिळू शकेल, निवडलेल्या विषयासंबंधित इतर उपप्रश्न विचारता येतील व शंकांचे निरसन करून घेता येईल. आवश्यक असेल तर व्हिडिओ कॉल (Zoom/Google Meet) ची सुविधा उपलब्ध आहे. वर नमूद केल्याप्रमाणे कुंडली विश्लेषण सेवेमध्ये PDF रिपोर्ट्सचा समावेश नाही. याचे मुख्य कारण म्हणजे Fully-customized Astrological PDF Reports स्वहस्ते लिहून तयार करणे (सॉफ्टवेअरद्वारे नव्हे) हे अतिशय वेळखाऊ काम आहे. तसेच त्या रिपोर्ट्समधील माहितीचा चुकीचा अर्थ लावून जातकाने कोणतीही कृती केल्यास त्याचे नुकसान होऊ शकते. त्याशिवाय कॉल किंवा चॅटवर तात्काळ शंकांचे निरसन करून घेण्याची संधी असते, तसे PDF रिपोर्ट्समध्ये शक्य नसते.

ज्योतिषीय सल्ला मिळवण्यासाठी तुम्ही मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांपैकी तुम्हाला जी भाषा संवाद करण्यास योग्य व सोयीस्कर वाटेल, ती निवडू शकता.

आम्ही देश परदेशातील अनेक नामांकित व्यक्ती, राजकारणी आणि व्यावसायिक यांना ज्योतिष मार्गदर्शन करतो. त्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान, अनुभव, विश्लेषणाची अचूकता, उपायांची उपयुक्तता व परिणामकारकता, आवश्यक असणारे सॉफ्टवेअर, संगणकीय प्रणाली, इंटरनेट, ऑफिस खर्च, कंटेंट व मार्केटिंग, इत्यादी अनेक खर्च विचारात घेता कमीत कमी ₹५१०० इतके शुल्क आकारणे ही आमची अपरिहार्यता आहे. अतिरिक्त सेवांसाठी आम्ही ₹५१००-११००० इतके शुल्क आकारतो.

तुम्ही दिलेले ₹५१०० शुल्क फक्त एकाच व्यक्तीच्या कुंडली विश्लेषण करण्यासाठी निर्धारित आहे. यामध्ये एका व्यक्तीच्या कुंडलीवरच मार्गदर्शन मिळेल. ६० मिनिटांच्या वेळेत त्या कुंडलीतील मुख्य प्रश्नाविषयी इतर उपप्रश्न विचारता येतील. मात्र विषय सोडून बाकीचे प्रश्न किंवा कुटुंबातील इतर सदस्यांविषयीही विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्या सेशन मध्ये दिली जाणार नाहीत. कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्तींसाठी कुंडली विश्लेषण सेवा एकत्रितरित्या घेतली असेल तर किंवा विवाहासाठी वधुवर मिलन करताना कुटुंबातील इतर सदस्यांविषयी तुम्ही प्रश्न विचारू शकता.

६० मिनिटांच्या एका सत्रात तुम्ही अमर्यादित प्रश्न विचारू शकता! तुम्ही निवडलेल्या करिअर, विवाह, आरोग्य, आर्थिक स्थिती, शिक्षण, इत्यादी कोणत्याही विषयावर चर्चा करता येईल. फक्त एक तासाची मर्यादा आहे, हे लक्षात असू द्या.

लोकप्रिय प्रश्न:

  • संतती योग आहे का? (लिंग निर्धारण करणे कायद्याने गुन्हा असल्यामुळे ती माहिती आम्ही जातकाला देत नाही, त्यासाठी हट्ट करू नये).
  • माझे करिअर कधी Settle होईल? कोणत्या क्षेत्रात करिअर करावे?
  • लग्न कधी होईल? विवाह योग कसा आहे? घटस्फोट होण्याची शक्यता आहे का? जोडीदार कसा मिळेल? प्रेम विवाह करावा कि ठरवून विवाह करावा?
  • नोकरी बदल करावी का की नाही? माझी बदली केव्हा होईल?
  • स्वतःचा व्यवसाय करावा की नोकरी?
  • कोणत्या क्षेत्रात मला घवघवीत यश मिळेल?
  • कोणत्या मार्गाने जास्त पैसा मिळेल?
  • मुलांचे शिक्षण कोणत्या शाखेतून करावे?

अजिबात नाही! आम्ही शक्यतो साधे, घरगुती उपाय सुचवतो जे तुम्ही स्वतः करू शकता:

  • देवतांचे व ग्रहांचे मंत्र व नित्य उपासना
  • दान (जर आवश्यक असेल तर)
  • शुभ रंग, दिवस, धातू यांबद्दल सूचना
  • रत्ने, उपरत्ने आणि रुद्राक्ष (महागडे रत्न खरेदी करणे अनिवार्य नाही.
  • वास्तूदोष असेल तर त्याबद्दलचे शास्त्रसुसंगत व व्यावहारिक उपाय

आम्ही जर खूपच आवश्यक असेल तर उपाय सुचवतो आणि ते उपाय करायचे कि नाही याबाबत तुम्ही स्वतः निर्णय घेऊ शकता. स्वतःचे कर्म आणि जीवनमान सकारात्मकरित्या बदलणे हाच सर्वात मोठा उपाय असतो, हे लक्षात ठेवा.

तुम्ही दिलेले ₹५१०० शुल्क फक्त एकाच व्यक्तीच्या कुंडली विश्लेषणासाठी निर्धारित आहे आणि फक्त ६० मिनिटांच्या एका सत्रासाठी (Consultation Session) वैध असेल. यामध्ये एका व्यक्तीच्या कुंडलीवरच मार्गदर्शन मिळेल. या ६० मिनिटांच्या वेळेत त्या कुंडलीतील मुख्य प्रश्नाविषयी इतर उपप्रश्न विचारता येतील. नंतरच्या प्रश्नांसाठी नवीन सत्र बुक करावे लागेल.

पेमेंटची पूर्तता झाल्यावर आणि तुमच्या जन्माचा तपशील मिळाल्यानंतर तुम्हाला एक Payment Confirmation Message व्हॉट्सॲपद्वारे पाठवला जाईल. त्यानंतर कुंडली विश्लेषण कधी केले जाईल याचीसुद्धा माहिती दिली जाईल. अगोदरच खूप बुकिंग्स असतील तर काही वेळ लागू शकतो, याची नोंद घ्यावी. त्यानंतर तुमच्या कुंडलीसाठी जन्मवेळ शुद्धीकरण करून तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल. शक्यतो १२ ते ४८ तासांच्या आत मार्गदर्शन मिळेल. मात्र त्यापेक्षा जास्त वेळ लागणार असेल तर तसे कॉल किंवा व्हॉट्सॲपद्वारे कळवले जाईल.

आम्ही प्रत्येक जातकाची वैयक्तिक माहिती १००% सुरक्षित ठेवतो. तुमचे नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थान ही माहिती फक्त तुमच्या कुंडलीचे विश्लेषण करण्यासाठी वापरली जाते व इतर कोणाशीही शेअर करत नाही. मात्र आमच्याकडे असणाऱ्या सर्व किंवा काही निवडक कुंडल्यांचे विश्लेषण ज्योतिषीय संशोधनासाठी केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त केवळ तुम्ही फीडबॅक किंवा रिव्ह्यू म्हणून दिलेली माहिती आमच्या वेबसाईट आणि सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर केली जाऊ शकते.

आम्ही आमच्या ज्योतिषीय सेवांबाबत १००% प्रामाणिक आणि पारदर्शक आहोत. जातकाने दिलेल्या माहितीच्या आधारे अतिशय प्रगत KP Astrology द्वारे अतिशय शास्त्रशुद्ध आणि स्थळ, काळ, वेळ, व्यक्ती, तसेच सामाजिक परंपरा यांचा समन्वय साधून आम्ही प्रॅक्टिकल मार्गदर्शन करतो. परंतु ज्योतिष ही एक विद्या तसेच कला आहे, जादू नाही. त्यामुळे आमच्या ज्योतिषीय सेवा तुम्हाला दिशा व आयुष्याबाबतची स्पष्टता देऊ शकतात, पण भविष्य बदलणे फक्त तुमच्या कर्मावर अवलंबून आहे.

आतापर्यंत आमच्याकडे कुंडली विश्लेषण करून घेतलेले १००% क्लायंट्स अत्यंत समाधानी आहेत. त्यामुळे तुम्ही पेमेंट करण्याआधीच आमचे शुल्क ‘नॉन-रिफंडेबल’ आहे, तसेच तुम्हाला खरोखरच आमच्याकडून कुंडली विश्लेषण करून घ्यायचे आहे का, याची खातरजमा करा. आमची वेळ, रिसोर्सेस, आणि मेहनत या सर्व गोष्टींची गुंतवणूक पाहता कोणत्याही परिस्थितीत कुंडली विश्लेषण किंवा अन्य सेवांसाठी दिलेले शुल्क परत केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. मागाहून तक्रार स्वीकारली जाणार नाही.

आम्ही कुंडली तयार करण्यासाठी आणि जन्मवेळ शुद्धीकरण प्रक्रियेसाठी Premium KP Astrology Software वापरतो जे अत्यंत अचूक गणना करते. मात्र लक्षात घ्या, सॉफ्टवेअर फक्त गणनेसाठी आहे. कुंडलीचे सखोल विश्लेषण करून जातकाला योग्य मार्गदर्शन करणे हे पूर्णपणे आमच्या ज्योतिषीय ज्ञान, कौशल्य, आणि अनुभवावर आधारित आहे.

Need Help?
Search
Menu
0
Shopping Cart (0)
Spend  1,499.00 more to enjor Free shipping!